England Cricket | मोईन अलीची कसोटीतून निवृत्ती

लंडन – इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू व आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा खेळाडू मोईन अली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कारकीर्द लांबवण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे अलीने सांगितले आहे. आगामी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा तसेच त्यानंतर होत असलेली ऍशेस कसोटी मालिका समोर असतानाच त्याने हा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला.

मोईन आता इंग्लंडकडून केवळ एकदिवसीय तसेच टी-20 क्रिकेट खेळत राहणार असून, काऊंटी क्रिकेट आणि टी-20 लीग स्पर्धांमध्येही खेळत राहणार आहे.

त्याने महान अष्टपैलू इयान बोथम आणि गॅरी सोबर्स यांच्या कामगिरीला मागे टाकत कसोटीत सर्वांत कमी सामने खेळताना 2 हजारपेक्षा जास्त धावा व 100 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.