नवी दिल्ली – कातसुमी युसा याच्या गोलच्या जोरावर गतविजेत्या चेन्नई सिटी संघाने आय लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात मोहन बागान संघास 1-1 ने बरोबरीत रोखले.
मोहन बागान संघाकडून पापा बाबाकार दियावारा याने 45 व्या मिनिटाला गोल नोदंविला. तर, त्यानंतर कातसुमी याने 67 व्या मिनिटाला गोल करत संघास बरोबरी साधून दिली. यानंतर निर्धारित वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले आणि हा सामना बरोबरीत सुटला.
.@Mohun_Bagan ????#HeroILeague ? #IndianFootball ⚽ #LeagueForAll ? pic.twitter.com/P2uQgWKL8q
— Hero I-League (@ILeagueOfficial) March 6, 2020
या बरोबरीसह मोहन बागान संघ 36 गुणासह गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. तर, चेन्नई सिटी संघ 20 गुणासह सातव्या स्थानी कायम आहे.