मुंबई – मागील काही दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी मराठी माणसाचं घर जप्त केल्याचे म्हटले होते. तर आता भाजप नेते भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांचे ट्विट
सलीम का भोंगा बंद किया है ,
जावेद का भी जल्द भोंगा बंद होगा !— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 6, 2022