“मलंग’ या चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी हा सध्या “एक विलन-2 ‘या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 2014 मध्ये आलेल्या त्याच्या “एक विलेन’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, दिशा पटनी, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया झळकणार आहेत. याबरोबरच मोहित “आशिकी’चा तिसरा भागही बनवणार असल्याचे समजते. 2013 मध्ये आलेल्या “आशिकी 2′ या चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे.
“आशिकी 2′ हा चित्रपट 1990 मध्ये आलेल्या महेश भट्ट दिग्दर्शित “आशिकी’वर आधारित परंतु पूर्ण नव्या कथानकासह बनलेला चित्रपट होता. मोहित सुरीचा सर्वांत आवडता चित्रपट म्हणून तो ओळखला जातो. कारण या चित्रपटाने मोहितला मुख्य प्रवाहात आणले. या चित्रपटाने श्रद्धा कपूरला तीन फ्लॉप चित्रपटांनंतर आणि आदित्य रॉय कपूरला दोन फ्लॉप चित्रपटांनंतर सुपरहिट बनवले. एक विलेन 2′ च्या चित्रीकरणादरम्यानच मोहितच्या मनात “आशिकी 3’ची संकल्पना आकार घेऊ लागली होती.
“एक विलन’साठी सिद्धार्थने नकार दिल्यानंतर मोहित सुरी त्याच्यावर नाराज झाला असल्याची चर्चा होती. परंतु वास्तव तसे नाही. कारण मोहितने त्याच वेळी “माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ झळकेल’ असे मोहितने सांगितले होते. आता “आशिकी 3’चा नायक सिद्धार्थच असेल असे मानण्यास जागा आहे.