कोपरगाव (प्रतिनिधी)- जागतीक किर्तीचे श्रध्दास्थान असलेले श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे जनसंपर्क अधिकारी मोक्षन यादव यांचे करोनावर उपचार घेता नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यु झाला. मोहन यादव यांना गेल्या काही दिवसापासून करोनाची लागन झाल्याने त्यांना नाशिक येथे एका खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले होते.
शुक्रवारी उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती ज्यास्त खालावल्याने उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. अश्यातच त्यांच्या डोक्यातील मेंदूत गठळी झाल्याने छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली तरीही त्यातुन ते वाचू शकले नाहीत अखेर शुक्रवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान यादव यांचा मृत्यु झाला. यादव यांच्या मृत्युने शिर्डीवर दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी आहे.
स्व. मोहन यादव यांनी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे गेल्या १५ वर्षापासून जनसंपर्क विभागाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी देश विदेशातील भक्तांशी मोठा जनसंपर्क ठेलवा होता. त्यांचा मनमिळावू स्वभाव व स्वच्छ कार्यशैलीने साईबाबा संस्थानला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या मिळवून दिल्या. के. व्ही. रमणी सारख्या भक्ताने ११० कोटी रुपयांचे भव्य साई आश्रम बांधून दिले. त्या आश्रमात साईभक्तांची उत्तम व्यवस्था केली जाते. करोनाच्या संकट काळात हे आश्रम कोव्हीड केअर हॉस्पिटल म्हणून सुरु केले आहे.
साईबाबा संस्थानचा महीमा सर्वदुर पसरविण्यात यादव यांचा मोलाचा वाटा आहे. यादव यांनी लिहीलेले श्री साईचरित्र दर्शन हे पुस्तक साईभक्तांच्या मनात बिंबले. या पुस्तकाचे तब्बल १२ भाषेत रूपांतर झाले. सर्व श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मोहन यादव यांच्या अचानक निधनाची वार्ता समजताच समस्त भक्तासह राहता, शिर्डी, कोपरगाव परिसरतील नागरीकांना आश्चर्याचा धक्क बसला आहे. यादव यांच्या अकस्मात मृत्युमुळे साईबाबा संस्थाने एक हरहुन्नरी जनसंपर्क अधिकारी गमावला आहे.
साईबांबाच्या भक्तांसाठी व साईबाबांसाठी प्रामाणिक सेवा देवून विकास काम करणारा साई बाबांचा सच्चा भक्त म्हणजे मोहन यादव होते. त्यांच्या निधनामुळे साई दरबारातील एक चांगल्या अधिकाऱ्याला मुकलो आहोत अशी खंत साईबाबा संस्थानचे विश्वस्त व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केली.