मोहननगर पोलीस चौकीत राडा

टेबल, टिव्हीची तोडफोड : पोलिसांनाही शिवीगाळ

पिंपरी – पिंपरी पोलीस ठाण्याच्या अख्यारित असलेल्या मोहननगर पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी आणलेल्या एकाने तुफान राडा घालत चौकीमधील टिव्ही, टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जावून त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि.26) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी योगेश दामोदर पवार (वय 29, रा. रामनगर, सहजीवन कंपनीसमोर, चिंचवड) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मोहननगर पोलीस चौकीतील पोलिसांनी एका प्रकरणातील आरोपी योगेश याला चौकशीसाठी चौकीत आणले होते. यावेळी आरोपी योगेश याने चौकीत आल्यानंतर पोलीस हवालदार खाडे यांच्या अंगावर धावत जावून त्यांना शिवीगाळ केली. आरोपी योगेश एवढा भडकला होता, की त्याने चौकीतील खुर्च्यांना लाथ मारुन चौकीत ठेवलेला टेबल पाडला. तसेच कपाटावरील टिव्ही पाडून तोडफोड केली.

Leave A Reply

Your email address will not be published.