नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर यांनी टीका केली आहे. मोहन भागवत यांचे हे विधान प्रतिगामी आणि मुर्खतापूर्ण असल्याचे तिने सोनमने म्हटले आहे. शिक्षण आणि संपन्नता यासोबतच अहंकारही येतो. आजकाल घटस्फोटाची प्रकरणे वाढली आहेत.
सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे दिसतात. शिक्षण आणि संप्ततेमुळे माणसात अहंकार येतो. त्यामुळे कुटुंबे विभाजित होत आहेत, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक मोहन भागवत यांनी केले होते. यावर सोनम कपूर यांनी ट्विट करत भागवत यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.