Mohan Bhagwat West Bengal Visit। पश्चिम बंगालमध्ये आता ऐका वर्षात विधानसभा निवडणूक लागणार आहेत. त्यासाठी आतापासूनच राजकीय पक्षाने कंबर कसली असल्याचे दिसत आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील आपली निवडणुकांच्या दृष्टीने आखणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालमध्ये १० दिवसांचा दौरा केला आहे. त्याच दौऱ्याची आज जाहीर सभेने सांगता झाली आहे. या सभेला संबोधित करताना त्यांनी “जगाच्या विविधतेला स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच संघाचे उद्दिष्ट फक्त हिंदू समाजाला एकत्र करणे आहे.” असल्याचे म्हटले.
मोहन भागवत यांची ही सभा बंगालमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण, न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांची ही जाहीर सभा होत आहे. पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरू असल्याने पूरबा वर्धमान जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला आरएसएसच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर संघाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या सभेला परवानगी दिली.
मोहन भागवत म्हणाले की, देशभरात १ लाख ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक आहेत. तो कोणाकडूनही पैसे घेत नाही, तो स्वतः काम करतो. म्हणूनच आम्ही म्हणतोय की, आम्ही हे प्रसिद्ध होण्यासाठी करत नाही आहोत, तर भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
संघाचे कार्य एका ओळीत स्पष्ट
भागवत म्हणाले की,”संघाला काय करायचे आहे? जर या प्रश्नाचे उत्तर एकाच ओळीत द्यायचे असेल, तर संघ संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करू इच्छितो. हिंदू समाजाला एकत्र का करायचे? कारण या देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू समाज आहे.”असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले,”भारताला एक निसर्ग आहे आणि ज्यांना वाटले की ते त्या निसर्गासोबत राहू शकत नाहीत त्यांनी स्वतःचा वेगळा देश निर्माण केला. हिंदू जगाच्या विविधतेचा स्वीकार करून पुढे जातात.”
विविधता ही एकतेचे एकमेव रूप Mohan Bhagwat West Bengal Visit।
संघप्रमुख म्हणाले की, “आजकाल आपण विविधतेत एकता म्हणतो, हिंदूंचा असा विश्वास आहे की एकतेत विविधता आहे. बंगालमध्ये एका रॅलीला संबोधित करताना मोहन भागवत यांनी विविधतेत एकतेबद्दल बोलले आणि रामायणातील उदाहरणे दिली. ते म्हणाले की,”इथे राजे आणि सम्राटांची आठवण कोणालाच नाही पण तो राजा आठवतो ज्याने आपल्या वडिलांसाठी १४ वर्षे वनवासात घालवला आणि ज्याने आपल्या भावाचे चप्पल ठेवले आणि परतल्यावर आपल्या भावाला राज्य दिले.”
भागवत यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचे महत्त्व Mohan Bhagwat West Bengal Visit।
मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालच्या दहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी संघाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी संघाचे संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचीही भेट घेतली. दरम्यान भागवत यांचा हा पश्चिम बंगाल दौरा म्हत्त्वाचा मानला जात आहे, कारण येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेशशी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे बंगालच्या सीमावर्ती भागात तणाव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
#WATCH | Purba Bardhaman, West Bengal: RSS Chief Mohan Bhagwat says, “…What does the Sangh want to do? If this question has to be answered in one sentence, then the Sangh wants to unite the entire Hindu society. Why unite the Hindu society? Because the society responsible for… pic.twitter.com/7i4fY3m0J7
— ANI (@ANI) February 16, 2025
असा होता भागवतांचा पश्चिम बंगाल दौरा
८ फेब्रुवारी रोजी भागवत यांनी गेल्या ऑगस्टमध्ये कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या ज्युनियर डॉक्टरच्या पालकांची भेट घेतली होती.
नंतर, माध्यमांशी बोलताना, पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, “मोहन भागवत म्हणाले की, ते न्यायाच्या या लढाईत आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांना घटनेची आणि आमच्या भूमिकेची माहिती देणारे एक पत्र दिले आहे. त्यांनी सांगितले की ते आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत जेवणाचे आमंत्रणही दिले आहे.”
१० दिवसांच्या दौऱ्यात, भागवत यांनी राज्यातील उत्तर, दक्षिण आणि मध्य या तीन प्रांतांमधील संघाच्या कार्यकर्त्यांसोबत बंद दाराआड बैठका घेतल्या. त्यांनी बंगाल, बिहार, सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील राज्यस्तरीय स्वयंसेवकांची भेट घेतली होती. त्यांनतर भागवत यांनी वर्धमान शहरातील उल्लाश येथे मध्यप्रांताच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
शनिवारी त्यांनी पूर्व वर्धमान जिल्ह्यातील एका शाखेला भेट दिली होती. ६ फेब्रुवारी रोजी रात्री कोलकाता येथे आल्यानंतर, भागवत ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान संघाचे शहरातील प्रादेशिक मुख्यालय असलेल्या केशव भवन येथे संघ स्वयंसेवकांना भेटले होते. याचबरोबर त्यांनी इतर राज्यातील स्वयंसेवकांच्याही भेटी घेतल्या होत्या.