मुंबई – बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘मिथुन चक्रवर्ती’ यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख ‘मोहन भागवत’ यांची भेट घेतली आहे. मोहन भागवत यांनी चक्क मिथुन चक्रवर्तींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. सध्या त्यांच्या या खास भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. येत्या काही काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं बिगुलज वाजणार आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार का? या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra: RSS chief Mohan Bhagwat meets actor Mithun Chakraborty at the latter’s residence in Mumbai. Visuals from outside his residence. pic.twitter.com/U3LIkLG8Tv
— ANI (@ANI) February 16, 2021
दरम्यान, अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आजच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “लखनऊमध्ये आमची याआधी भेट झाली होती. आमच्या भेटीमागचं कारण हे अध्यात्मिक ओढ आहे. मी त्यांना त्यावेळी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार ते आज माझ्या मुंबईतील घरी आले. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकीय संबंध जोडू नये असं म्हणत भाजपातील पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.