मोहन भागवत, योगींवर आक्षेपार्ह टीका; गायिका हार्ड कौरविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल 

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केल्याने गायिका हार्ड कौर हिच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हार्ड कौर हिने अलीकडेच योगी आदित्यनाथ यांना ‘बलात्कारी’ आणि मोहन भागवत यांना ‘आतंकवादी’ म्हंटले होते.

यूके स्थित पंजाबी गायक हार्ड कौर हिचे मूळ नाव तरन कौर ढिल्लन आहे. हार्ड कौरच्या विरोधात वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. त्यांच्यानुसार, कौर हिच्या पोस्टमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

काय आहे प्रकरण 
हार्ड कौरने मोहन भागवत यांना जातिवादी म्हणून संबोधले असून देशातील मोठ्या दहशतवादी घटनांसाठीही त्यांना आणि त्यांची संघटना आरएसएसला जबाबदार धरले आहे. मग तो 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा किंवा पुलवामा येथील सीआरपीएफवरील दहशतवादी हल्ला असो. तसेच शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूसही आरएसएसला जबाबदार ठरविण्यात आले आहे. हार्ड  कौरने याआधीही अनेक अभिनेते-अभिनेत्रींवर, राजकीय व्यक्तींवर टीका केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने राष्ट्रद्रोहाच्या कलमाचा दुरूपयोग न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×