नेपियर :– भारत व यजमान न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी टाय झाला. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता मात्र, दुसरा सामना जिंकल्यामुळे भारत मालिकेत 1-0 असा आघाडीवर होता. तिसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्यासाठी आशावादी असलेल्या न्यूझीलंडचा या सामन्यातही आलेल्या पावसामुळे भ्रमनिरास झाला. ही मालिका भारतीय संघाने 1-0 अशाच फरकाने जिंकली. सूर्यकुमार यादव मालिकेचा तर महंमद सिराज सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवातही अत्यंत निराशाझनक झाली. सलामीवीर इशान किशन 10, ऋषभ पंत 11 यांनी साफ निराशा केली. फलंदाजीत बढती देण्यात आलेल्या श्रेयस अय्यरला तर खातेही उघडता आले नाही. त्यानंतर भरात असलेला सूर्यकुमार यादवही अपयशी ठरला. वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो अवघ्या 13 धावांवर परतला. यावेळी भारताच्या 4 बाद 60 धावा झाल्या होत्या.
Mohammed Siraj is adjudged Player of the Match for his brilliant bowling figures of 4/17 as the final T20I ends in a tie on DLS.
Scorecard – https://t.co/rUlivZ308H #NZvIND pic.twitter.com/kSHPp8wFTx
— BCCI (@BCCI) November 22, 2022
कर्णधार हार्दिक पंड्या 30 तर दीपक हुडा 9 धावांवर खेळत असताना 9 व्या षटकानंतर पुन्हा एकदा पावसाला प्रारंभ झाला व खेळ थांबला. त्यावेळी भारताची 4 बाद 75 अशी स्थिती बनली होती. पंचांनी वारंवार पाहणी केली मात्र, पाऊस न थांबल्यामुळे अखेर हा सामना डकवर्थ-लुईस सूत्रांनुसार टाय घोषित करण्यात आला. न्यूझीलंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना या सूत्रानुसार भारताला 9 षटकाअखेर 75 धावा करणे गरजेचे होते व बरोबर तीतक्याच धावा धावफलकावर होत्या.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा बदली कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वीही पावसाने व्यत्यय आणला होता मात्र, काही वेळातच पाऊस थांबला व खेळ सुरू झाला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही परंतु डेव्हन कॉनवे व ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला होता. एकवेळ 15 षटकांत 2 बाद 130 अशा सुस्थितीत असतानाच भारताच्या अर्शदीप सिंग व महंमद सिराज यांनी पुढील अवघ्या 20 धावांत त्यांचे आठ फलंदाज बाद केले व 19.4 षटकांत त्यांचा डाव 160 धावांवर संपुष्टात आला.
Innings Break!
A superb show with the ball from #TeamIndia! 💪 💪
4⃣ wickets each for Mohammed Siraj & Arshdeep Singh
1⃣ wicket for Harshal PatelOver to our batters now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/UtR64C00Rs #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/g59Uz7h2eh
— BCCI (@BCCI) November 22, 2022
कॉनवेने अर्धशतकी खेळी करताना 59 धावा केल्या. त्यात 49 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावले. पिलिप्सने 54 धावा करताना 33 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार फटकावले. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 63 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर त्यांचे फलंदाज पाठोपाठ बाद झाले. न्यूझीलंडची मधली फळी उधवस्त करताना सिराजने 17 धावांत 4 तर अर्शदीपने 37 धावांत 4 गडी बाद केले. हर्षल पटेलने 1 बळी घेतला. भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा सलग दुसरा मालिका विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2020 साली मालिका जिंकली होती.
#AUSvENG : तिसरा सामना 221 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडला व्हाइटवॉश
संक्षिप्त धावफलक :-
न्यूझीलंड – 19.4 षटकांत सर्वबाद 160 धावा. (डेव्हन कॉनवे 59, ग्लेन फिलिप्स 54, महंमद सिराज 4-17, अर्शदीप सिंग 4-37).
भारत – 9 षटकांत 4 बाद 75 धावा. (हार्दिक पंड्या नाबाद 30, दीपक हुडा नाबाद 9, टीम साऊदी 2-27).