ख्राईस्टचर्च : गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात खराब कामगिरी केल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात सलग दुसऱ्या व्हाइटवॉशला सामोरे जावे लागले आहे. यामुळे एकदिवसीय मालिकेपाठोपाठ (3-0) कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड (2-0) पहावे लागले.
दरम्यान, कसोटी मालिकेत प्रतिभावंत फलंदाज असलेल्या विराट कोहलीपेक्षा 9 व्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या मोहम्मद शमीने जास्त धावा केल्या. विराटने मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या व दुसऱ्या डावात अुनक्रमे 2(7) आणि 19(43) तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या व दुसऱ्या डावात अुनक्रमे 3(15) आणि 14(30) अशा एकूण 38 धावा केल्या.
तर, शमीने पहिल्या कसोटीत 21(20), 2(3) आणि दुसऱ्या कसोटीत 16(22) आणि 5(11) अशा संपूर्ण मालिकेत एकूण 44 धावा करत विराटपेक्षा 6 धावा अधिक केल्या.