#CWC19 : अफगाणिस्ताविरूध्दच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल

साउदॅम्पटन – भारत वि. अफगाणिस्तान हा सामना साउदॅम्पटन येथील रोझ बाऊल येथील मैदानावर थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान संघात दोन बदल करण्यात आले आहेत. आफ़ताब आलम आणि हज़रतुल्लाह यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, विजय शंकर, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

 

अफगाणिस्तान संघ पुढीलप्रमाणे – हज़रतुल्लाह, गुल्बदिन नाएब, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, इकराम अली ख़िल, असग़र अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह ज़ादरान, राशिद ख़ान, आफ़ताब आलम, मुजीब उर रहमान

Leave A Reply

Your email address will not be published.