खगोशींची हत्या मीच केली – मोहम्मद बिन सलमान

सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची महत्वपूर्ण कबुली

रियाद – पत्रकार जमाल खाशोगीची काही दिवसांपुर्वी इस्ताम्बुलयेथील सौदी अरेबियाच्या दुतावासात हत्या करण्यात आली होती. त्या हत्या प्रकरणात सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची महत्वपूर्ण कबुली समोर आली आहे. क्राऊन प्रिंसच्या देखरेखीखाली सर्व काही घडल. त्यामुळे जमाल खाशोगीच्या हत्येची जबाबदारी मोहम्मद बिन सलमान यांनी स्वीकारल्याचे पीबीएस डॉक्‍युमेंट्रीने म्हटले आहे. पुढच्या आठवडयात ही डॉक्‍युमेंट्री प्रदर्शित होणार आहे.

खाशोगी यांच्या हत्येनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ झाला. मोहम्मद बिन सलमान यांच्या सुधारणावादी प्रतिमेला तडा गेला. हत्या झाल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि पाश्‍चिमात्य देशातील सरकारांनी क्राऊन प्रिन्सच्या आदेशाने ही हत्या झाल्याचे म्हटले होते. मात्र, सौदीच्या अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन सलमान यांची हत्येमध्ये भूमिका फेटाळली होती. तर, खाशोगी यांच्या हत्येनंतर सौदीच्या क्राऊन प्रिन्सने अमेरिका आणि युरोपमध्ये पाऊल ठेवले नाही.

माझ्या देखरेखील हे सर्व घडले. त्यामुळे सर्व जबाबदारी माझी आहे असे मोहम्मद बिन सलमान यांनी पीबीएसच्या मार्टीन स्मिथ यांना सांगितले. “द क्राऊन प्रिन्स ऑफ सौदी अरेबिया’ ही डॉक्‍युमेंट्री 1 ऑक्‍टोंबरला प्रदर्शित होणार आहे. मोहम्मद बिन सलमान यांची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सौदीच्या अन्य अधिकाऱ्यांवर या हत्येची जबाबदारी टाकण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.