ICC ODI Ranking – आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा दबदबा पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सिराजने दमदार कामगिरी केलीय. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यात ९ बळी घेतले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत त्याने खेळलेल्या २ सामन्यात ५ गडी बाद केले. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सिराजला विश्रांती देण्यात आली होती. भारताने श्रीलंकेनंतर न्यूझीलंडविरुद्धही एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
#INDvNZ 3RD ODI : न्यूझीलंडला व्हाइटवॉश! अखेरच्या सामन्यातही Team India चा 90 धावांनी विजय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्याने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघासह खेळाडूंनाही मोठा फायदा झालाय. महत्वाचं म्हणजे भारताचा मोहम्मद सिराज गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. या यादीत त्याने इतर भल्या भल्या गोलंदाजांना मागे टाकले आहे. त्याचबरोबर सिराज हा पहिला क्रमांक मिळवणारा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याअगोदर कपिल देव, मनिंदर सिंग, अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली होती.
सिराजने मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये अत्यंत प्रभावीपणे गोलंदाजी केली आहे. त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकले आहे. सिराज ७२९ गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे, तर हेझलवूड ७२७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ट्रेंट बोल्ट ७०८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
🚨 There’s a new World No.1 in town 🚨
India’s pace sensation has climbed the summit of the @MRFWorldwide ICC Men’s ODI Bowler Rankings 🔥
More 👇
— ICC (@ICC) January 25, 2023
सिराजच्या एकदिवसीय क्रिकेटचा प्रवास खूपच अवघड राहिला. त्याने २०१९ साली भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघात खेळण्याची संधीच मिळावी नाही. त्यानंतर त्याचे २०२२च्या फेब्रुवारी महिन्यात भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन झाले. यानंतर सिराजने सातत्याने चांगली कामगिरी केली आणि संघातील आपले स्थान टिकवून ठेवले. सिराजने आतापर्यंत २१ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने २०.७३च्या सरासरीने ३८ बळी घेतले आहेत.