नवी दिल्ली – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नी हसीन जहॉंने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्याने शमीविरोधात पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.
क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. सरेंडरसाठी त्याला कोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे.
मात्र, शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.