सातारा – सध्याच्या काळात रेडिमेड फर्निचर किंवा घरामध्येच तयार करून घेण्याचे फर्निचर यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ग्राहकांना सतावत असतात. जर तयार फर्निचर घेतले, तर ते एका विशिष्ट आकारात तयार केलेले असते. तसेच हे फर्निचर आपल्या घराच्या रचनेनुसार घरामध्ये बसवताही येत नाही. किंवा ते योग्य मापामध्ये होत ही नाही. आणि फर्निचर मिस्त्रीकडून तयार करून घेताना वास, धुळ, कामगार, मशिनचे आवाज यामुळे त्रासदायक ठरते.
या सर्वावर उपाय म्हणून अश्वमेघ मॉड्युलर फर्निचर यांनी एक गोल्डन मिन म्हणून मॉड्युलर फर्निचर ही संकल्पना अस्तित्वात आणली. याबाबत प्रताप देशमुख यांनी सांगितले की, ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आणि त्यांच्या घराच्या रचनेप्रमाणे मोजमाप करून त्यांना हवे तसे फर्निचर तयार करून देता येते. यामध्ये अश्वमेघच्या जुन्या एमआयडीसी येथील फॅक्टरीमध्ये सदर फर्निचर हे तयार केले जाते. हे सगळे फर्निचर मशिनवर तयार केले जाते. मशिनवरच प्लायवूडला लॅमिनेशन पेस्ट केले जाते.
मशिनवरच प्लाय कट केला जातो. सुट्टे भाग जोडण्यासाठी मल्टीबोरिंग मशिनही येथे उपलब्ध आहे. बेड, वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, टीव्ही युनिट, लॉफ्ट क्लोजिंग, कबर्ड क्लोजिंग हे सर्व फॅक्टरीत तयार करून घरामध्ये आणून जोडले जाते. यामुळे इंटिरिअर डिझायनरची फी, मटेरिअलसाठी धावाधाव, वाहतुक खर्च, दुकानदाराचे मार्जिन, वेस्टेज, लेबर चार्ज हा खर्च खुप वाचतो. आणि एकुण 20 टक्के कमी दरात काम होते.
सदर फर्निचर हे फोल्ड करून बॉक्स पॅकिंग करून दुसरीकडेही नेता येते. पावसाळ्यामध्ये प्लायवुड फुगू नये म्हणून वॉटरप्रुफ प्लायवूड येथे उपलब्ध आहे. लॅमिनेटस् मध्ये वेगवेगळे ब्रॅंडही येथे उपलब्ध आहेत. आणि त्यातुन एखादा भाग खराब झाला तर तेवढाच भाग बदलता येतो हा सगळ्यात मोठा मॉड्युलर फर्निचरचा फायदा आहे. अश्वमेघ मध्ये ग्रेड नुसार प्लायवूडमध्ये देखील व्हरायटी उपलब्ध आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार फर्निचर केल्यानंतर घर कसे दिसेल याची थ्रीडी डिझाईन देखील या ठिकाणी बनवली जाते. अश्वमेघ फर्निचरने गेली 16 वर्ष मॉड्युलर किचनमध्ये स्वतःचे नाव सातारा आणि पुणे जिल्ह्यात तयार केले आहे. म्हणूनच रेडिमेड फर्निचर आणि तयार करून घेतलेले फर्निचर यातला गोल्डन मिन काढायचा असेल तर राधिका रोडवरील अश्वमेघ मॉड्युलर फर्निचरला जरूर भेट द्यावी असे आवाहन प्रताप देशमुख यांनी केले आहे.