भारतासाठी मोदींचे कार्य अतुलनीय -डोनाल्ड ट्रम्प

ह्यूस्टन : अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील उपस्थित होते. ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतूक केले. भारतासाठी मोदींचे कार्य अतुलनीय आहे त्यामुळेच त्यांना भारताच्या नागरिकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी दिली असल्याचे सांगत ट्रम्प यांनी मोदींवर कौतूकांचा वर्षाव केला.

आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत तसेच जर मोदींनी मला भारतात बोलावले तर मी नक्‍की येईन असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटले. अमरिकेच्या विकासात इथल्या भारतीयांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतीकारी टेक्‍नॉलॉजी आणत आहेत तसेच भारत अमेरिकेत गुंतवणूक करत आहे त्याचे आम्ही स्वागत करत असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी म्हटले. बेरोजगारीवर बोलताना ट्रम्प यांनी, दोन्ही देशांमध्ये नोकऱ्या देण्याचे प्रमाण वाढले असून जवळपास 33 टक्‍के बेरोजगारी दोन्ही देशांत कमी झाली असल्याचा दावा देखील यावेळी ट्रम्प यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी भारत आणि अमेरिका यांना सीमा सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असून मुस्लिम कट्टरपंथीयांशी आम्ही एकत्रितपणे लढा देवू असेही ट्रम्प यांनी यावेळी म्हटले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×