नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदारांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या महिला खासदारांना त्यांनी आपल्या निवासस्थानी न्याहरीसाठी बोलावले होते. पक्षाच्या खासदारांचे विविध गट पाडून त्यांच्याशी मोदी संवाद साधत आहेत. हा खासदारांचा पाचवा गट होता.
या आधी त्यांनी पक्षाच्या एससी, एसटी, आणि ओबीसा खासदारांशी चर्चा केली आहे. जे खासदार आधी मंत्री होते अशा खासदारांचीही स्वतंत्र गट करण्यात आला होता. त्यांच्याशीही मोदींनी चर्चा केली आहे. आज महिला खासदारांच्या बैठकीत अगदी अनौपचारीक चर्चा झाली.
त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी इत्यादी यावेळी उपस्थित होते. सतराव्या लोकसभेत एकूण 78 महिला खासदार असून त्यातील 41 जणी भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.