‘कुठल्याही संकटाला संधीत रूपांतर करणे मोदींची खासियत’

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस असून त्यानिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल नेटवर्किंगवरही मोदींच्या वाढदिवसाचीच चर्चा असल्याचं चित्र दिसत आहे.   यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनोख्या शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी ट्विट केले आहे की,’युवकांचे नेते, गरिबांचे नेते, निर्विवाद, निश्चयी, निर्णायक नेते…मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !’ आज जागतिक पातळीवर भारताची ओळख आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन व अमेरिकाशिवाय इतर देश दिसत नव्हती, मात्र मोदींच्या नेतृत्वात आज भारत जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण करून पुढे जात आहे. आज भारताची मते ग्राह्य धरली जातात. मोदींनी एक आत्मनिर्भर भारताची निर्मिती केली आहे. असे तोंडभरून कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.