‘चहावाला म्हणण्यापेक्षा चहावाल्याचा मुलगा म्हणा’ मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचं वक्तव्य

मुंबई –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू व ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप एसोसिएशन के उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘कोरोना संकटात व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षांपासून त्यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीतही सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. तुम्ही सर्वजण एकत्र या अन् जीएसटी भरायला नकार द्या’ असं म्हणत त्यांनी व्यापारी वर्गाला आवाहन केले आहे. 

ते पुढे म्हणाले,’नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही.’

दरम्यान, उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात  आलेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मागण्या मान्य न होईलपर्यंत जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला. तसेच कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ, उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी मोदी यांच्याकडे येथील व्यापाऱ्यांनी केली. 

यावेळी ते असेही म्हणाले की,’माझ्या वडिलांनी आमच्या  ६ भावंडांना चहा विकून मोठं केलं, मात्र पत्रकार नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणतात ही त्यांची चूक आहे. त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणावे.’  ते पुढे म्हणाले,’चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, मात्र ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात’, असंही ते म्हणाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.