रात्रीस खेळ चाले! मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल 

पुणे – पुणे जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-रिपाइं (ए) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्‍टोबरला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार असून त्यासाठी तयारी सुरु झाली आहे. यावेळी सभेला अडथळा ठरणारी कॉलेजच्या परिसरातील जवळपास २० ते २५ झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव झाडे कापण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितली आहे.

मोदींच्या सभेवेळी महायुतीचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील 21 मतदारसंघांतील उमेदवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार गिरीश बापट आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आले त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत कलम 370 सह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, याचा लाभ निश्‍चित महायुतीच्या उमेदवारांना होईल, असे बापट म्हणाले. पुण्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाचा सक्षम उमेदवारच नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर काही ठिकाणी उमेदवारच मिळालेले नाहीत. त्यांना मनसेच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा लागतो, यावरून सर्वकाही स्पष्ट होते, अशी टीकाही बापट यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.