राजस्थानमध्ये मोदी ‘राज’ 

नवी दिल्ली – राजस्थान लोकसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी निराशाजनक आहेत. भाजप पुन्हा एकदा २०१४ चा इतिहास घडवत असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर काँग्रेस २ -३ जागांवरच समाधान मानताना दिसत आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत राजस्थान जनतेने काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा दिला होता. परंतु, पाच महिन्यातच परिस्थिती बदलली असून राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मोदींचा करिष्मा दिसला आहे.

विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये ‘मोदीजीसे बैर नही, वसुंधरा कि खैर नही’ ही घोषणा फारच लोकप्रिय झाला होता. भाजप नेत्या वसुंधरा राजे सिंधिया यांच्यावर राजस्थान जनता नाराज होती. परंतु, बालाकोट एअर स्ट्राईक, उज्जवल योजना, पंतप्रधान आवास योजना आणि स्वच्छ भारत या योजनांना जनतेने पसंती दिली. निवडणुकीच्या काळातच अलवर सामूहिक बलात्कार प्रकरणाने काँग्रेस पराभवाच्या छायेत आहे. यामुळे राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना टीकेचा सामना करावा लागला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×