विरोधकांनी कायमच आपल्या जवानांचा अवमान केला- नरेंद्र मोदी

सॅम पित्रोदांच्या विधानांवर मोदींचा आक्षेप

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात तीनशे अतिरेकी मारले गेले असतील तर ते ठिक आहे पण तेथे एकही अतिरेकी मारला गेलेला नाही, असे जर विदेशातील प्रसार माध्यमे म्हणत असतील तर त्याविषयी भारत सरकारने पुरावे द्यायला नकोत काय ? असा सवाल उपस्थित करणारे सॅम पित्रोदा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

त्यांनी म्हटले आहे की विरोधकांनी कायमच आपल्या जवानांचा अवमान केला असून अतिरेक्‍यांना मदत होईल अशीच विधाने सातत्याने केली आहेत. जनता माफ नही करेगी या नावाने हॅशटॅग करीत मोदींनी हा ट्‌विटर संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सॅम पित्रोदा हे कॉंग्रेसचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी मुंबई हल्ल्याचे उदाहरण देताना त्यावेळी भारताने पाकिस्तानवर हल्ला करणे गरजेचे होते पण अशा पद्धतीने तुम्ही जगाशी वागणूक करू शकत नाही असे पित्रोदा यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या घराण्याशी निष्ठा असलेले म्हणत आहेत की दहशतवादाला प्रत्त्युत्तर देण्यास कॉंग्रेस उत्सुक नव्हती असेच त्यांच्या विधानातून ध्वनीत होत आहे. पण हा नवीन भारत आहे. आता दहशतवाद्यांना त्यांना समजेल अशाच भाषेत व्याजसह प्रत्युत्तर दिले जाईल असे त्यांनी नमूद केले.

समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी काल असा आरोप केला होता की राजकीय लाभ घेण्याच्या उद्देशानच पुलवामाचा हल्ल घडवला गेला त्यात आपले अनेक जवान शहीद झाले. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर या हल्ल्या मागे नेमके कोण होते ते उघड होईल आणि त्यात मोठी नावे समोर येतील असे यादव यांनी म्हटले होते. त्याचा संदर्भ देऊन मोदींनी आपल्या ट्‌विटरवर म्हटले आहे की, दहशतवद्यांची भलामण करून आपल्या सैनिकांच्या शौर्याविषयी प्रश्‍न चिन्ह उपस्थित करणे ही त्यांची नैसर्गिक सवय आहे. काश्‍मीरचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचा हा अवमान आहे असेही मोदींनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)