‘मोदींसाठी उड्डाण परवानग्या नाकारल्याने विरोधक प्रचारापासून वंचित’

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात प्रचार सभा होती. पण, प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आल्याने आजच्या प्रचार सभांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

आज चोपडा पाईट, भोसरी, पिंपरी आणि चिंचवडची सभा होती. परंतू, केवळ पुणे परिसरात मोदींची सभा असल्याने जाणीवपूर्वक उड्डाण परवानग्या नाकारल्या गेल्या. देशाचे पंतप्रधान जर एका पक्षाच्या प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवणं कितपत बरोबर आहे, हे किती लोकशाहीच्या मुल्यांना धरून आहे, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.