मोदींचे हे अपयश आता हॉवर्डमध्ये अभ्यासाचा विषय ठरेल; राहुल गांधी यांची पुन्हा मोदी सरकारवर टीका

 

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. आज त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी आणि भारतातील करोनाचा प्रसार या अपयशावर मार्मिकपणे बोट ठेवले आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटरवर म्हटले आहे की, हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये आता भारतातील मोदी सरकारच्या कोविड-19, नोटाबंदी आणि जीएसटीच्या अपयशाचे विषय हे अभ्यासाचे विषय म्हणून ठेवले जातील. या ट्‌विटर संदेशात त्यांनी मोदींच्या विविध ठिकाणच्या भाषणांचे एकत्रित व्हिडीओही शेअर केले आहेत.

त्यात मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवा, दिवे प्रज्वलित करा, या विषयावरील वक्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. करोनाच्या बाबतीत बोलताना मोदी यांनी म्हटले होते की, महाभारताचे युद्ध 18 दिवस लढले गेले तसे करोना विरुद्धचे हे युद्ध आपण 21 दिवसात जिंकू. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. करोनाच्या रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हा नव्याने निशाणा साधला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.