अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : काश्मीरच्या प्रकरणावरून मागील काही दिवसांत अमेरिकेने मध्यस्थी केल्याच्या चर्चांमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. दरम्यान आता याच प्रकरणावर अमेरिकेकडून आणखी एक प्रतिक्रिया आली आहे. काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा सर्वस्वी मोदींचा निर्णय आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
US President Donald Trump yesterday on India rejects US’s mediation offer for Kashmir:It is really up to PM Modi. And I met with Prime Minister Khan;I got along great.I think they’re a fantastic people,Khan and Modi.I mean I would imagine they can get along very well. (file pic) pic.twitter.com/Qjs92ql33H
— ANI (@ANI) August 2, 2019
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी मला काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी मला विनंती केली होती असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. मात्र भारताच्या परराष्ट्र खात्याने हे वक्तव्य फेटाळून लावले होते. त्यानंतर आता याच संदर्भात ट्रम्प यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील दीर्घकाळ चाललेला प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे. मी या प्रश्नात मध्यस्थी करायची की नाही हा मोदींचा निर्णय असेल असे आता ट्रम्प यांनी म्हटले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनाही भेटलो आहे. दोन्ही माणसे मला खूप आवडलीच, त्यांच्यात काश्मीर प्रश्न धुमसतो आहे. याबाबत मी भारताशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. मात्र या दोघांनी चर्चा करण्याची गरज आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.