मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल; ‘या’ नेत्यांचा समावेश 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिपदांची शपथ घेण्याचा मान कुणाला मिळणार याविषयीचा सस्पेन्स आता संपला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सगळ्या खासदारांसोबत नरेंद्र मोदी यांची ४.३० वाजता बैठक होणार आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना आता फोन केले जात आहेत.

यानुसार शपथविधीसाठी रविशंकर प्रसाद, सदानंद गौड़ा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, जी किशन रेड्डी आणि मुख्तार अब्बास नकवी यांना फोन आले आहेत. याशिवाय अर्जुन मेघवाल, प्रल्हाद पटेल, बाबुल सुप्रिमो, निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, कैलाश चौधरी, किरण रिजिजू, नितिन गडकरी, किशनपाल गुर्जर, हरसिमरत कौर, थावरचंद गहलोत, राव इंद्रजीत सिंह आणि रामदास आठवले यांनाही पंतप्रधान कार्यकल्यातून फोन आले आहेत. यामुळे संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा चेहरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु, गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही बिग फोर मंत्रालये कुणाकडे जाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.