अहमदाबाद – सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) नूतनीकरणानंतर सज्ज झाले असून जगातील सर्वांत जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानाचे उद्घाटन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
हे मैदान जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान ठरणार असून 1 लाख 10 हजार प्रेक्षक क्षमता येथे आहे. लार्सन अँड टूब्रो कंपनीने या स्टेडियमचे नूतनीकरण केले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एप्रिल महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन होणार असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे.
एप्रिल महिन्यातच या स्टेडियमवर पहिला सामना होणार असून हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, लॉन टेनिस, बॅटमिंटन, जलतरण या क्रीडा प्रकारांसाठीही अतिरिक्त संकुल या स्टेडियमच्या प्रांगणात तयार करण्यात आले आहे.
अत्याधुनिक सुविधा
या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम, मिटींग रूम, सेंट्रल एसी आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या स्टेडियमच्या सज्जतेसाठी जवळपास 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.