नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढ्यातील ढाल म्हणून उपयुक्त ठरत असलेल्या कोविड टेस्टिंग किटमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ इंडियाला महागड्या दराने टेस्टिंग किटची विक्री करण्यात आल्याचे समोर येत आहे. या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
जब समूचा देश #Covid19 आपदा से लड़ रहा है, तब भी कुछ लोग अनुचित मुनाफ़ा कमाने से नहीं चूकते। इस भ्रष्ट मानसिकता पे शर्म आती है, घिन आती है। हम PM से माँग करते हैं कि इन मुनाफ़ाख़ोरों पर जल्द ही कड़ी कार्यवाही की जाए।देश उन्हें कभी माफ़ नहीं करेगा। https://t.co/t7Ff3KQM96
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 27, 2020
संपूर्ण देश कोरोना विषाणूने निर्माण झालेल्याय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आहे. या परिस्थितीतही काही लोक आपला फायदा पाहत आहेत. या भ्रष्ट मानसिकता लाजिरवाणी अशी आहे. देशवासिय या लोकांना कधीच माफ करणार नाहीत, असा उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्ट किटची किंमत २२४ रुपये इतकी आहे. मात्र आयात करणारी मंडळी हे किट आयसीएमआरला तब्बल ६०० रुपयांन विकत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयाने किट ४०० रुपयांनी विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.
चीनमधून आयात करण्यात येत असलेल्या कोविड १९ रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातील खरेदी-विक्रीतील वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर यासंदर्भातील दराचा खुलासा झाला आहे. देश संकटात असताना काहीजण फायदाचा विचार करत आहेत. ही गोष्ट लाजिरवाणी असून जी लोक संकटाच्या काळात फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.