ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार ?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांचे निकाल ऐन दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. ट्विटरवर ईव्हीएम मशीन एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत नेल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं व्हिडियोमध्ये दिसत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप केला आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यातील एका व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. यामध्ये काहीजण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स गाडीतून बाहेर काढून एका दुकानाच्या आतमध्ये नेत असल्याचं दिसत आहे.

https://twitter.com/890sagarwala/status/1130731155307749376

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×