मोदींनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले : राहुल गांधी

राफेल प्रकरणात केला नवीन गौप्यस्फोट

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणावरून हल्लाबोल सुरूच ठेवला असून आज त्यांनी एका इमेलचा आधार घेऊन नवीन गौप्यस्फोट केला. मोदी आणि फ्रांस सरकार मध्ये प्रत्यक्ष राफेलचा करार होण्यापुर्वी अनिल अंबानी यांना या कराराची माहिती होती व त्यांनी पंधरा दिवस आधीच फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांशी आणि त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी या प्रकरणी चर्चाही केली होती असा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणात पंतप्रधानांनी अनिल अंबानी यांच्या मध्यस्थाचीच भूमिका केली असल्याचा आरोप त्यांनी केला. राफेल व्यवहाराची माहिती केवळ पंतप्रधानांनाच असणे अपेक्षित असताना अनिल अंबानी यांना त्याची माहिती कोणी दिली व प्रत्यक्ष करार होण्याच्या आधी ते फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांना कसे भेटले असे प्रश्‍न राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केले. मोदींनीच अंबानी यांना या कराराची माहिती दिली आणि त्यांच्या सुचनेवरूनच अनिल अंबानी यांनी आपली संरक्षण उत्पादन कंपनी रजिस्टर केली असा दावाही त्यांनी केला.

या साऱ्या प्रकरणात मोदींना एखाद्या हेरासारखी कामगीरी करून देशद्रोह केला आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेशीही तडजोड केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या म्हणण्याच्या प्रित्यर्थ राहुल गांधी यांनी एअरबस अधिकाऱ्याने फ्रांसच्या एका अधिकाऱ्याला पाठवलेल्या इमेलची प्रत सादर केली. राहुल गांधी यांनी राफेलवरील कॅगचा अहवालही अमान्य केला. त्यांनी या विषयी म्हटले आहे की हा चौकीदार ऑडिटर जनरलचा अहवाल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)