मोदी उद्यापासून सहभागी होणार प्रचारधुमाळीत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मार्चपासून लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारधुमाळीत सहभागी होणार आहेत. सलग दोन दिवस सहा राज्यांत सहा सभा घेऊन ते एकप्रकारे भाजपच्या प्रचाराचा धडाक्‍यात प्रारंभ करतील.

निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. आता भाजपच्या प्रचाराचा झंझावात निर्माण करण्यास मोदी सज्ज झाले आहेत. त्यांच्या 28 मार्चला उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये सभा होतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी एक सभा होईल. त्या सभा लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) मतदानाला सामोऱ्या जाणाऱ्या मतदारसंघांमध्ये होतील. भाजपच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने मोदी यांच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचार सभा उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.