मोदी 24 सप्टेंबरच्या क्वाड परिषदेला उपस्थित राहणार

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी हे येत्या 24 सप्टेंबर रोजी वॉशिंग्टन येथे होणाऱ्या क्वाड देशांच्या प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. क्वाड संघटनेत चार प्रमुख देशांचा समावेश असून त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची ही बैठक असणार आहे. त्यानिमीत्त पंतप्रधान अमेरिकाच्या दौऱ्यावर जात असून 25 सप्टेंबर रोजी संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेतील कामकाजातही ते सहभागी होणार आहेत.

या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशीही थेट चर्चा करणार आहेत. क्वाड ही अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांची संघटना असून चीनच्या वाढत्या सामर्थ्याला आणि त्यांच्या एकूणच आक्रमक भूमिकेला आळा घालण्यासाठी हे चार देश या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत.

या आधी या चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची 12 मार्चला बैठक झाली होती. त्यानंतर राष्ट्र नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणारी ही पहिलीच बैठक असेल. संघटनेचा मूळ उद्देश चीनच्या वाढत्या आक्रमकतेला पायबंद घालण्याचा असला तरी प्रत्यक्ष कार्यक्रम पत्रिकेवर मात्र अफगाणिस्तानातील स्थिती, कोविड लसीकरण हे विषय आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.