Sanjay Raut : नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वाेच्च नागरी सन्मान ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-3’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. तसेच मोदी परदेश दौऱ्यावर असताना मोदींनी ही युद्धाची वेळ नाही असे विधान केले होते. यावरून देखील राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
पाकविरुद्ध सुरू असलेले दहशतवादाविरुद्धचे युद्धच प्रे. ट्रम्प यांनी थांबवले. तेव्हापासून मोदी हे ‘ओम शांती शांती’चा मंत्र जपत आहेत, अशा कडवट शब्दांत मोदींच्या भूमिकेवरून टीका केली आहे. तर अहमदाबाद येथे विमान अपघातात २४१ प्रवासी ठार झाले. देश शोकसागरात असताना पंतप्रधान मोोदी हे सायप्रस देशात जाऊन फोटो काढतात, असा सवाल विचारण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडात जी ७ बैठकीलागही गेले होते. युद्ध बरे नाही ही युद्धाची वेळ नाही असे विधान म्हणल्याचे प्रसिद्ध झाले. मोदी यांच्या विचारात हा बदल नक्की कधी झाला ते शांतीदूत कसे झाले असे सवाल राऊतांनी विचारला आहे. सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे.
ऑपरेशन सिंदूर’ या नावामागेही एक भावनिक राजकारण
या अग्रलेखातून उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपने मते मागितली, पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामागेही एक भावनिक राजकारण असल्याचे म्हटले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले, त्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला काय हे सायप्रस मुक्कामी शांती राग आळवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करायला हवे. कश्मीरात भाजपने राजकीय विचका केला व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पचका केला. असा घाणाघात आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा: पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम