“मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकून देऊ शकते पण राज्यातल्या निवडणूक नाही”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

नवी दिल्ली : बेंगळुरूमध्ये नुकतीच भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.  “केवळ मोदी लाट पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकत नाही’ असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले.

देशातील मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, परंतु राज्यात निवडणूक जिंकायची असेल तर पक्षाला विकास कामे करावीच लागतील,  येडियुरप्पा यांनी व्यक्त केले.  कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपाने आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

“पंतप्रधान मोदी केंद्रात खूप काम करत आहेत. पुढील निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान होतील. पण राज्यातील काँग्रेसला जाग आली आहे. विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे आपण अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. बूथ स्तरापासून पक्षबांधणी करायला हवी, तरच आपण काँग्रेसला धडा शिकवू शकतो. हानेगल आणि सिंदगी मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे,” असेही येडियुरप्पा म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.