पाकिस्तान आणि दहशतवादला प्रखर प्रत्युत्तर देण्यासाठीच मोदी हवेत – शहा

बंगळुरू – दहशतवाद आणि पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. शहा यांनी शिमोगा येथे भाजप उमेदवार बी वाय राघवेंद्र यांच्यासाठी मोठा रोड शो केला.

या मतदारसंघात राघवेंद्र यांची लढाई धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मधु बंगारप्पा यांच्याशी होत आहे. रोड शोच्या समारोपाच्यावेळी बोलताना ते म्हणाले की ही निवडणूक केवळ राघवेंद्र यांना खासदार बनवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्फत मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठीची आहे.

या लोकसभा मतदार संघात जे आठ विधानसभा मतदार संघ येतात त्यातील सात मतदार संघात भाजपचे आमदार आहेत आणि कॉंग्रेसचा केवळ एक आमदार आहे. त्यामुळे ही निवडणूक कॉंग्रेस जेडीएस आघाडीसाठी एक मोठे आव्हान आहे. शहा म्हणाले की माझ्या स्वताच्याही मतदार संघात येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे तथापि राघवेंद्र यांच्या प्रचारासाठी आपण येथे मुद्दामहून आलो आहोत असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.