नवी दिल्ली – नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सांगितले. आपल्या देशाने तालिबानांशी केलेल्या शांततेच्या कराराबद्दलही आपण मोदींशी बोललो. हा शांतता करार झालेले भारतालाही आवडेल असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी मोदींना मोठे नेते आणि भारत हा खूप मोठा देश म्हणून संबोधले.
“आम्ही धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा केली. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. आपण जर मागे वळून पाहिले तर भारताने धार्मिक स्वातंत्र्यासाठी खूप परिश्रम घेतले असल्याचे दिसते.’ असे ट्रम्प म्हणाले.
तथापि, जेव्हा त्यांनी आपल्या भेटीदरम्यान येथे हिंसक घटनांबद्दल चर्चा केली का असे विचारले असता पंतप्रधान मोदींशी व्यक्तिगत हल्ल्यांवर चर्चा केली नाही. हा विषय भारतावर अवलंबून आहे, असे ट्रम्प म्हणाले.
भारत अमेरिकेकडून बरीच लष्करी सामुग्री खरेदी करत असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न झाल्याच्या वृत्तांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गुप्तचर यंत्रणांनी अशी माहिती कधीही आपल्याला दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.