पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; पहिल्याच दिवशी विविध नेत्यांच्या भेटीगाठी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि अमेरिकेतील निवडक कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत.

या कंपन्यांमध्ये क्वालकॉम, ऍडोब, ब्लॅकस्टोन, जनरल ऍटोमिक्‍स आणि फर्स्ट सोलर या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या कंपन्यांनी भारतात मोठया प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. यापुढेही भारतात या कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक केली जाण्याची शक्‍यता असणार आहे. या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वित्त पुरवठा ते संरक्षण आणि नवीकरणीय उर्जा अशा भिन्न भिन्न क्षेत्रीाल कंपन्यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेतील ही गुंतवणूक भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे. विशेषतः “मेक इन इंडिया’ साठी ही गुंतवणूक भारताच्या प्रगतीसाठी खूप महत्वाची असणार आहे.

गुरुवारी मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी मोदी भिन्न विषयांवर संवाद साधणार आहे, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अलिकडेच स्थापन झालेल्या “ऑकस’ गटाची माहिती मॉरिसन यांनी पंतप्रधान मोदी यांना कळवली होती. त्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. यावर्षी जानेवारीत मॉरिसन भारत दौऱ्य.ावर येणे अपेक्षित होते. मात्र ऑस्ट्रेलियात भडकलेल्या वणव्यांमुळे त्यांना ओपला भारत दौरा रद्द करावा लागला होता. नंतर मे महिन्यातही करोनाच्या साथीमुळे त्यांच्या दौऱ्याचे नियोजन पुढे ढकलावे लागले होते.

24 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची मोदी भेट घेणार आहेत. बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष भेट होत आहे. व्हाईट हाऊसमध्येच मोदी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचीही भेट घेणार आहेत. यावेळी करोना विरोधी उपाययोजना, हायटेक , अंतराळ विज्ञान यासारख्या क्षेत्रातील सहकार्य अशा अनेक विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा सहभाग असलेल्या “कॉड’गटाच्या बैठकीलाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.