देशाचा बदललेला मूड मोदींना समजला ; शरद पवारांचा टोला 

 शौर्य कुणी दाखवलं, अन्‌ छाती कोण दाखवतंय 

नाशिक: शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणी छाती कोण दाखवतंय, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एअर स्ट्राइकवरून अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसेच देशाचा मूड बदलला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजले. त्यामुळेच त्यांनी हवाई हल्ल्याचं आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण करण्यास सुरुवात केली, अशा हल्लाबोलही त्यांनी केला.

नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोल होते. डिसेंबर महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्ये भाजपाने गमावली. यानंतर जनता आपल्याला नाकारणार याची कुठेतरी या सरकारला खात्री पटू लागली. त्यानंतर आता जवानांच्या शौर्याचे राजकारण केले जात आहे. यातच विद्यमान सरकार धन्यता मानत आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.

जवानांनी एअर स्ट्राईक करून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. मात्र सरकार याचा राजकीय फायदा घेत आहे. सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता राखायची हे या सरकारच धोरण आहे. भाजप नेत्यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

गेल्या साडेचार वर्षांत सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय अपयशी ठरला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फटका बसला असून देशात मोठी बेरोजगारी असल्याचे सरकारी अहवालातूनच स्पष्ट झाले आहे. याशिवाय कर्जमाफीची फक्‍त घोषणाच करण्यात आली. त्याचा प्रत्यक्ष लाभ कोणालाही न झाल्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. संकुचित विचार असणारे हेच सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हुकूमशाही येईल, असा इशारा त्यांनी दिला.

निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा दुरूपयोग होत असल्याचे सांगताना शरद पवार यांनी मध्यप्रदेशात एका ठिकाणी ईव्हीएम मशीनची तपासणी केली तर कोणतेही बटन दाबल्यावर कमळला मत जात होते, असे सांगितले. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या मतदारसंघात तर 700 मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.