Modi-Trump Meeting । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील द्विपक्षीय बैठक संपली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. चर्चेदरम्यान रशिया-युक्रेन युद्धाचाही उल्लेख करण्यात आला असून तो संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा आणि करार करण्यात आले आहेत. जे करार दोन्ही देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. दोन्ही देशात झालेल्या ५ महत्वाच्या गोष्टी आणि करार कोणते? त्या जाणुन घेऊ…
पहिला करार – F35 स्टेल्थ फायटर जेट
संरक्षण क्षेत्रात भारत आणि अमेरिकेत मोठा करार झाला आहे. या करारानुसार, अमेरिका आता भारताला F35 स्टेल्थ लढाऊ विमान पुरवणार आहे. याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनी, “यावर्षीच ते भारतासोबतच्या लष्करी विक्रीत लक्षणीय वाढ करणार आहेत. याशिवाय, आम्ही आता भारताला F35 स्टेल्थ लढाऊ विमाने देऊ.” अशी घोषणा केली.
दुसरा करार – ट्रम्प आयएमईसीसाठी तयार
अमेरिका भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसाठी तयार आहे. खरं तर, हा एक असा कॉरिडॉर आहे ज्याद्वारे शिया, अरबी आखात आणि युरोपमधील आर्थिक एकात्मता आणि कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळू शकते. याशिवाय, या मार्गाने आर्थिक वाढ देखील होण्यास मदत होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. या कॉरिडॉरकडे चीनच्या रोड अँड बेल्ट प्रोजेक्टला विरोध म्हणून पाहिले जात असल्याने त्याचे महत्त्व वाढते.
तिसरा करार – व्यापार दुप्पट होईल
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि अमेरिकेतील व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवली आहे. सध्या भारत आणि अमेरिकेतील व्यापार १२९.२ अब्ज डॉलर्सचा आहे, परंतु २०३० पर्यंत हा आकडा ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणे आवश्यक आहे.
चौथा करार – अमेरिका तेल आणि वायूचा पुरवठा करणार
चर्चेदरम्यान, तेल आणि वायू खरेदीबाबत एक मोठा करार झाला. अध्यक्ष ट्रम्प यांनी भर दिला आहे की अमेरिका भारताचा सर्वात मोठा तेल आणि वायू पुरवठादार बनणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य ऐतिहासिकदृष्ट्या वाढेल.
पाचवा करार – अमेरिकेत आणखी दोन दूतावास Modi-Trump Meeting ।
ट्रम्प आणि मोदी यांच्यात दोन नवीन दूतावास उघडण्याबाबत एक मोठी घोषणाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “लवकरच बोस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये दोन दूतावास उघडणार आहेत.” याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माहिती देताना, “या दूतावासांमुळे भारत आणि अमेरिकेतील जनतेशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील.” असे म्हटले. तसेच “अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत” यावरही पंतप्रधानांनी भर दिला.