मोदींनी कॅनडियन नागरिकाला INS सुमित्रावर नेले, हे कसे चालते; काँग्रेसचा पलटवार  

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसने मोदींवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना भारतीय नौदलाच्या INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. दरम्यान काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची सोशल मीडिया सांभाळणारी दिव्या स्पंदना यांनी ट्विटरद्वारे मोदींना लक्ष्य केले.

दिव्या स्पंदना यांनी म्हंटले कि, तुम्ही कॅनडियन नागरिक अक्षय कुमारला INS सुमित्रावर घेऊन गेले हे चालते का? यावेळी स्पंदना यांनी हॅशटॅग करत सबसे बडा झूठ मोदी असे लिहले असून अक्षय कुमारचे फोटोही पोस्ट केले आहेत. एवढेच नव्हेतर अक्षय कुमारने नौसैनिक आणि काही अतिथीसह INS सुमित्रा या युद्धनौकेला चालवलेही होते, असेही स्पंदना यांनी म्हंटले आहे.

https://twitter.com/divyaspandana/status/1126444665975201794

दरम्यान, याआधी नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा स्वस्तात वापर करून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.