रॉयल विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही करणार संबोधित
थिंफू (भुतान)- भुतानच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांच्याशी आज विविध क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक करण्याच्या हेतूने व्यापक चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यानची भागीदारीला अधिक व्यापक करण्याच्या हेतूने या चर्चेमध्ये अधिक चेतना आणि विश्वासार्हता होती असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
भूतानमध्ये 1629 साली उभरण्यात आलेल्या सिम्तोका झोंग येथे दोन्ही नेत्यांदरम्यामान सामंजस्य करार केले जातील, असेही रवीश कुमार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भुतानच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधानपदाच्या गेल्या कार्यकाळात ते पहिल्यांदा भुतान दौऱ्यावर गेले होते.
भारत आणि भूतानदरम्यान उत्तम द्विपक्षीय संबंध असून विकास भागीदारी, परस्पर हिताचे जलविद्युत सहकार्य आणि मजबूत व्यापार आणि आर्थिक संबंध अधोरेखित करतात. सामायिक, धार्मिक वारसा आणि उभय देशांमधील जनतेतील संबंधांमुळे ते अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही देशांनी गेल्यावर्षी अधिकृत राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव संयुक्तपणे साजरा केला होता, असे पंतप्रधानांनी भुतानला रवाना होण्यापूर्वीच्या ट्विटमध्ये म्हटले होते.
भुतानमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी यांना समारंभपूर्वक स्वागतासाठी ताशिछोझोंग राजप्रासादामध्ये पारंपारिक चिपड्रेक मिरवणूक आणि “गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. याप्रसंगी भुतानचे राजेही उपस्थित होते. त्यापूर्वी पंतप्रधान लोटे त्शेरींग यांनी पारो विमानतळावर मोदींचे जंगी स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी दोन्ही देशांचे ध्वज घेऊन उभे होते. भूतानच्या प्रतिष्ठीत रॉयल विद्यापीठात युवा भूतानी विद्यार्थ्यांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत.