“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची सरकारवर पुन्हा टीका

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरु असून याच लाटेने भारताचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. तर देशात तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे.  या पार्श्वभूमीवर सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

करोना काळात विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीकासत्र सुरु आहे. राहुल गांधी सतत मोदी सरकारवर शाब्दीक हल्ले करत आहेत. राहुल गांधी म्हणाले, “येणाऱ्या काळात मुलांना करोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे”

यापुर्वी देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे.’, असे राहुल गांधी म्हणाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.