सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांचा समावेश

अमित शहा, जयशंकर यांनाही मिळाले स्थान

नवी दिल्ली – पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले. त्यामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि माजी परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांचाही समावेश आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन्‌, रामविलास पासवान या मागील सरकारमधील प्रमुख मंत्र्यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली.

येथील राष्ट्रपती भवनच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रत्येकी 24 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आणि राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. तर उर्वरित 9 जणांनी स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजनाथ, शहा, गडकरी, सीतारामन्‌, जयशंकर आणि पासवान यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. इतर कॅबिनेट मंत्र्यांमध्ये रविशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर, हरसिम्रत कौर बादल, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराज सिंह आणि गजेंद्र शेखावत यांचा समावेश आहे. जयशंकर हे सरप्राईज पिक ठरले.

संतोषकुमार गंगवार, राव इंदरजित सिंह, श्रीपाद नाईक, जितेंद्र सिंह, किरण रिजीजू, प्रल्हादसिंह पटेल, राजकुमार सिंह, हरदीपसिंग पुरी आणि मनसुख मांडवीय यांच्यावर स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या राज्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर फग्गनसिंह कुलस्ते, अश्‍विनीकुमार चौबे, अर्जुनराम मेघवाल, व्ही.के.सिंह, कृष्णपाल, रावसाहेब दानवे, जी.किशन रेड्डी, परषोत्तम रूपाला, रामदास आठवले यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. इतर राज्यमंत्र्यांमध्ये साध्वी निरंजन ज्योती, बाबूल सुप्रियो, संजीवकुमार बालियान, संजय धोत्रे, अनुराग ठाकूर, सुरेश आंगडी, नित्यानंद राय, रत्तनलाल कटारिया, व्ही.मुरलीधरन, रेणुकासिंह सारूता, सोम प्रकाश, रामेश्‍वर तेली, प्रतापचंद्र सारंगी, कैलाश चौधरी आणि देबश्री चौधुरी यांचा समावेश आहे.

शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रांतील सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित होते. त्यांच्यात बिमस्टेक देशांच्या प्रमुखांबरोबरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. उद्योग जगतातील दिग्गज, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. त्या सोहळ्यामुळे पंतप्रधान म्हणून मोदींची दुसरी इनिंग आता सुरू झाली आहे.

कॅबिनेट मंत्री
नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह
अमित शहा
नितीन गडकरी
डीव्ही सदानंद गौडा
निर्मला सितारामन
रामविलास पासवान
नरेंद्रसिंह तोमर
रविशंकर प्रसाद
हरसिम्रत कौर बादल
थावरचंद गेहलोत
एस. जयशंकर
रमेश पोखरियाल निशंक
अर्जुन मुंडा
स्मृती इराणी
डॉ. हर्ष वर्धन
प्रकाश जावडेकर
पियुष गोयल
धर्मेंद्र प्रधान
मुख्तार अब्बास नख्वी
प्रल्हाद जोशी
महेंद्रनाथ पांडे
अरविंद सावंत
गिरीराज सिंह
गजेंद्र सिंह शेखावत

राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)
संतोष कुमार गंगवार
राव इंद्रजित सिंह
श्रीपाद नाईक
जितेंद्र सिंह
किरण रिजिजू
प्रल्हाद पटेल
आर. के. सिंह
हरदिपसिंग पुरी
मनसुख मांडवीय

राज्यमंत्री
फग्गनसिंह कुलस्ते
अश्‍विनीकुमार चौबे
अर्जुन मेघवाल
व्ही के सिंह
कृष्णपाल गुर्जर
रावसाहेब दानवे
किशन रेड्‌डी
पुरुषोत्तम रुपाला
रामदास आठवले
साध्वी निरंजन ज्योती
बाबूल सुप्रियो
डॉ. संजीव बलियान
संजय धोत्रे
अनुरागसिंग ठाकूर
सुरेश अंगडी
नित्यानंद राय
रतनलाल कटारिया
व्ही. मुरलीधरन
रेणुकासिंह सरुता
सोम प्रकाश
रामेश्‍वर तेली
प्रताप सारंगी
कैलाश चौधरी
देबश्री चौधरी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×