मोदींनी ईव्हीएमवर बैठक बोलवायला हवी होती; मायावतींचे टीकास्त्र

 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. एक देश आणि एक निवडणूक, या विषयावर चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना दिल्लीत बोलाविले होते. मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत.

त्या म्हणाल्या, मोदींनी या विषयावर चर्चा करण्याऐवजी इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशिन या विषयावर बैठक आयोजित केली असती तर मी या बैठकीला गेले असते. एक देश एक निवडणूक हा केवळ लोकांचे देशातील वाढत्या दारिद्य्रावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, एकाच वेळी देशभरात सर्वच पातळ्यांवरील निवडणुका घेणे हा काही लोकशाही पुरक पर्याय होऊ शकत नाही. विरोधकांनी सातत्याने मागणी करूनही बॅलट पेपर ऐवजी इलेक्‍ट्रॉनिक वोटींग मशिनवरच चिकटून राहणे हाच लोकशाहीला मोठा धोका आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.