आणीबाणीच्या कठीण काळावर मोदी-शहांचे भाष्य

नवी दिल्ली: तात्कालीन इंदिरा गांधी सरकारने 25 जून 1975 या दिवशी देशात आणीबाणी लागू केली होती. भाजपने नेहमी आणीबाणीवरून कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आज आणीबाणीला 44 वर्ष पूर्ण जाले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकून आणीबाणीच्या कठीण काळावर भाष्य केले आहे. या व्हिडीओत दडपशाहीचा कठोर काळ दाखविण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं व्यतिरीक्त आणीबाणीची आठवण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहासह अनेक मंत्र्यांनी ट्‌विटद्वारे करून दिली. कॉंग्रेस सरकारने कशा प्रकारे जनतेवर दडपशाही लादली आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती. तसेच राजकीय नेत्यांना कसा त्रास दिला याची आठवण करू दिली.

यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिले की आजच्या दिवशी राजकीय हितासाठी लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. तर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्‌विट करून आणीबाणीच्या काळा दिनांची आठवण करून दिली.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×