मोदी रावण तर राहुल गांधी राम; काँग्रेसचा पोस्टरवार

भोपाळ – राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधत असतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्यप्रदेशात वादग्रस्त पोस्टर लावले आहे. या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रूपात तर राहुल गांधी यांना रामाच्या रूपात दाखवले आहे.

राहुल गांधी आज भोपाळमध्ये एक रॅली करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे पोस्टर लावण्यात आले आहेत. काँग्रेसच्या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. या पोस्टरवर मोदींची दहा तोंडे दिसत असून यामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चेहरे दिसत आहेत. या पोस्टरवर चौकीदारही चोर है अशा मथळ्याखाली चोरो तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं, असा मजकूर लिहिला आहे.

https://twitter.com/ANI/status/1093728133008609281

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)