नरेंद्र मोदी-राहुल गांधी आमने-सामने

निवडणूक प्रचाराला रंग चढणार ः राज्यात मोदींच्या 9, तर राहुल गांधींच्या 3 प्रचारसभा
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकणार आहेत. राज्यात या दोन्ही नेत्यांच्या एकाच दिवशी म्हणजे 13 ऑक्‍टोबर रोजी सभा होणार आहेत. मोदी आणि गांधींच्या सभांमुळे निवडणूक प्रचाराला आणखी रंग चढणार आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी कमी दिवस असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विजयादशमीनंतर राज्यात प्रचाराला सुरूवात केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक प्रचारात उतरले आहेत. आता या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेस नेते राहुल गांधी प्रचारात उतरणार आहेत.

पंतप्रधान राज्यभरात चार दिवसांत 9 प्रचारसभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचारसभा 13 ऑक्‍टोबर रोजी जळगाव येथे होणार आहे. त्याच दिवशी भंडाऱ्यातील साकोली येथे मोदी यांची प्रचारसभा होणार आहे. त्यानंतर 16 ऑक्‍टोबर रोजी बुधवारी अकोला, जालन्यातील परतूर व पनवेल येथे प्रचारसभा घेण्यात येणार आहेत. गुरुवारी 17 ऑक्‍टोबर रोजी बीडमधील परळी, पुणे व सातारा येथे मोदी यांची सभा होणार आहे. प्रचारसभेचा समारोप शुक्रवारी 18 ऑक्‍टोबर रोजी मुंबईत होणार आहेत.

राहुल गांधींच्या तीन सभा
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील नेत्यांना टाकत कॉंग्रेस नेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, राहुल गांधी 13 ऑक्‍टोबर रोजी एकाच दिवशी 3 सभा घेणार आहेत. औसातील उमेदवार बसवराज पाटील, चांदिवलीतील नसीम खान आणि धारावीतील वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)