मोदींनी झाशीच्या राणींना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली: झाशी संस्थानाच्या संरक्षणासाठी ब्रिटीशांशी शौर्याने लढा देऊन इतिहासात आपली कर्तबगारी नोंदवणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज 191 वी जयंती होती. त्यानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की लक्षावधी भारतीयांसाठी त्यांचे धैर्य आणि निडरपणा प्रेरणादायी ठरला आहे. त्या प्रखर देशभक्त होत्या.

भारताच्या स्वाभीमानाचा जिथे विषय आला तेथे त्यांनी कदापिही तडजोड केली नाही. त्यांनी साम्राज्यवाद्यांच्या विरोधात धैर्याने लढा दिला. अशा महान शूर व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन अशा शब्दात त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 1828 साली वाराणसीत झाला. त्यांचे मूळ नाव मनकर्णिका तांबे असे होते. झाशी संस्थानच्या त्या प्रमुख होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.